Hinjawadi : हाणामारीप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – होम थिएटरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून हाणामारी झाली. ही घटना माण येथे रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी मुकिंदा गोविंद पवार (वय 38, रा. टीसीजी कंपनी साईट, फेज 3, माण, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नूर आलम अली खान (वय 21), राहूल शेषराम चव्हाण (वय 24) इतर दोघेजण (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरोपी नूर याने त्याच्या घरामध्ये होम थिएटर मोठ्या आवाजात लावला होता. त्याचा आवाज कमी कर, असे सांगण्यासाठी फिर्यादी यांचा मित्र अनिल गौतम वाव्हळ हे गेले. त्यावेळी नूर याने त्यांच्या पायावर रॉडने मारहाण केली. तसेच मुकिंदा यांना राहूल चव्हाण याने डोक्‍यात रॉड मारून जखमी केले. इतर दोघांनी फिर्यादी यांच्या दोन मित्रांना सळईने डोक्‍यात मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली.

याच्या परस्परविरोधात नूर आलम मोहम्मद अली (वय 21) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मुकिंदा गोविंद पवार, अनिल गौतम वाव्हळ आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • रविवारी दुपारी आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी नूर आणि त्यांचा मित्र राहूल चव्हाण यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच इतर मित्र इरफान रफिक खान आणि मुस्तफा महम्मद अली यांना डोक्‍यात सळईने मारून जखमी केले. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिवटे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.