BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : कारने धडका देऊन दोन कारचे नुकसान; कारचालक महिलेविरोधात गुन्हा दाखल (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारला धडक दिली. त्यानंतर वारंवार धडका देऊन कारचे नुकसान केले. तसेच अन्य एका कारला धडक देऊन नुकसान केले. याप्रकरणी कारचालक महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20) पहाटे बावधन येथील रामनगर परिसरात घडली.

स्वाती सौरभ मिश्रा (रा. रामनगर कॉलनी, बावधन) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दर्श सुभाष चावला (वय 28, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वाती मिश्रा पहाटे त्यांच्या डस्टर कारमधून (एम एच 12 / के टी 1736) घरी आल्या. रामनगर मधील श्री विहार सोसायटीच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला दर्श यांची नॅनो कार (एम एच 01 / ए व्ही 6373) पार्क केली होती. भरधाव वेगात आलेल्या डस्टर कारने दर्श यांच्या नॅनो कारला धडक दिली. त्यानंतर वारंवार धडका दिल्या. यामध्ये नॅनो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आरोपी महिलेने रस्त्याच्या बाजूला असलेल्या आणखी एका कारला धडक देऊन नुकसान केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. महिलेने सोसायटीतील लोकांना शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक आर आर दिवटे तपास करीत आहेत.

आरोपी महिलेचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. तिच्यावर मानसोपचार सुरू आहेत. मात्र, ‘ही महिला मंगळवारी पहाटे मद्यधुंद अवस्थेत होती आणि तेथे गोळा झालेल्या नागरिकांच्या अंगावरदेखील तिने कार घालण्याचा प्रयत्न केला,’ असा स्थानिकांचा दावा आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like