Hinjawadi News : कारच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील कारने धडक दिल्यामुळे पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. तर पादचारी व्यक्तीचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मुंबई – बेंगलोर महामार्गावर बालेवाडी येथे सोमवारी (दि. 2)  सकाळी नऊच्या सुमारास घडली.

संभाजी शिवराम क्षीरसागर (वय 50) असे अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. तर त्यांचा भाऊ बाळू विश्वनाथ सुतार (वय 60 रा. जाधव वस्ती, बावधन पुणे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परमजितसिंग जोगिंदरसिंग चड्डा (वय 58 रा. बाणेर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मोटर चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास बालेवाडी स्टेडियम जवळ फिर्यादी सुतार आणि त्यांचा भाऊ संभाजी क्षीरसागर हे दोघेजण रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या (एम एच 14 / जे एम 2674) या कारने त्या दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात क्षीरसागर यांचा मृत्यू झाला. तर सुतार यांच्या हाताला आणि पायाला फॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.