BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : डिपॉझिटच्या पैशांवरून वाद; महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – फ्लॅटमध्ये भाड्याने राहत असलेल्या भाडेकरूला फ्लॅट खाली करण्यास सांगितले. भाडेकरूने फ्लॅट (रिकामा) खाली केला. मात्र, डिपॉझिटसाठी दिलेल्या पैशांवरून भाडेकरू आणि मालक यांच्यामध्ये भांडण झाले. भांडणात भाडेकरूने मालक महिलेचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 1) दुपारी दीडच्या सुमारास हिंजवडी येथे घडली.

संदीप तालेरी (रा. हैदराबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबी गेस्ट हाऊस ब्ल्युरीच हिंजवडी येथे फिर्यादी महिलेचा फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये संदीप मागील काही महिन्यांपासून भाड्याने राहत आहे. महिलेने फ्लॅट प्रल्हाद मोदी यांना विकला. त्यामुळे त्यांनी संदीप याला फ्लॅट खाली करण्यासाठी महिलेने मागील तीन महिन्यांपासून सांगितले. तरीही त्याने फ्लॅट खाली केला नाही. त्याच्या मागे लागल्यामुळे त्याने शनिवारी दुपारी खाली केला.

त्यानंतर मोदी यांनी फ्लॅटच्या रकमेचा धनादेश दिला. त्यामुळे फिर्यादीकडे संदीपला डिपॉझिटचे पैसे देण्यासाठी रोख रक्कम नव्हती. त्यामुळे त्यांनी सोमवारी पैसे देण्याचे सांगितले. यावरून फिर्यादी महिला, त्यांचा भाऊ आणि संदीप यांच्यात भांडण झाले.

  • या भांडणात संदीप याने महिलेच्या भावाला मारहाण करत महिलेचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A2

.