Hinjawadi : 25 हजारांची लाच घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – 25 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई आज, शुक्रवारी करण्यात आली आहे. लाचखोर पोलीस उपनिरीक्षक हिंजवडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहे.

मिलन कुरकुटे असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराकडून तडजोड करून 25 हजारांची लाच आरोपी उपनिरीक्षकाने स्वीकारली आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील हिंजवडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना हा प्रकार घडला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. लाच घेण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1