Hinjawadi : रूमवर राहणा-या तरुणीचा विनयभंग; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रूमवर राहणा-या तरुणीचा अज्ञात इसमाने विनयभंग केला. ही घटना हिंजवडी फेज एक येथे रविवारी (दि. 15) दुपारी घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हिंजवडी फेज एक येथे तिच्या मैत्रिणींसोबत राहते. रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास फ्लॅटमधील तिच्या सहकारी मैत्रिणी त्यांच्या खोलीत झोपल्या होत्या. त्यावेळी गॅलरीमधून एक अनोखळी व्यक्ती आत आला.

त्याने हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घातला होता. त्याने तरुणीला ढकलून तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.