Hinjawadi : सामायिक विहिरीवर टँकरमध्ये पाणी भरताना दोन गटात वाद

Dispute between two groups over filling water in tanker on shared well

एमपीसी न्यूज – सामायिक विहिरीवर टँकरमध्ये पाणी भरताना दोन गटात वाद झाला. यात झालेल्या मारहाणीत एकाला गंभीर दुखापत झाली आहे. हा प्रकार  शुक्रवारी (दि. 12) सकाळी आठच्या सुमारास मुळशी तालुक्यातील सूसगाव येथे घडला.

प्रमोद तुकाराम चांदेरे, सुनील काशिनाथ चांदेरे, प्रसाद तुकाराम चांदेरे, तुकाराम श्रीपती चांदेरे, विशाल काशिनाथ चांदेरे (सर्व रा. सूसगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अमोल प्रशांत चांदेरे (वय 32, रा. सूसगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामायिक क्षेत्रातील सामायिक विहिरीवर फिर्यादी हे टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी गेले. त्याचा राग आल्याने आरोपी यांनी फिर्यादी, त्यांचे चुलते भीमा श्रीपद चांदेरे, फिर्यादी यांचे चुलत भाऊ तुषार चांदेरे यांना हाताने, बांबूने, दगडाने मारहाण केली.

त्यामध्ये सुदाम श्रीपद चांदेरे यांना गंभीर दुखापत झाली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.