Hinjawadi : श्वानाला कारने चिरडले; कार चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – श्वानाला कारने चिरडल्या प्रकरणी (Hinjawadi) कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वानाला चिरडल्याची घटना 23 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथील भारती बाजार येथे घडली.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 31) फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14/बीके 3755 क्रमांकाच्या कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SSC Result : मोठी बातमी! उद्या लागणार दहावीचा निकाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती बाजार येथे असलेल्या एका मादी श्वानाला फिर्यादी दररोज जेवण देत होत्या. तसेच फिर्यादी (Hinjawadi) संबंधित मादी श्वानाची काळजी घेत होत्या.

23 मे रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास एका कारने मादी श्वानाला चिरडून ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम 429 तसेच महाराष्ट्र प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.