Hinjawadi Crime News : ‘तरुणीला मेसेज करू नको’, असे सांगणाऱ्यास लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – तरुणीला मेसेज करू नको, असे समजावून सांगत असताना चार जणांनी मिळून एकाला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 7) दुपारी दोन वाजता कोकाटे वस्ती, बावधन येथे घडली.

अशोक मडके, रेणुका मडके, ज्ञानदेव मडके, अर्जुन मडके (सर्व रा. कोकाटे वस्ती, बावधन) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत बळीराम उद्धव शिंदे (वय 24, रा. कुंबरे चाळ, आझादनगर, कोथरूड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रामचंद्र घाटे यांच्या मुलीला एसएमएस करू नको’ असे फिर्यादी शिंदे यांनी आरोपींना समजावून सांगितले. त्यावेळी आरोपींनी शिंदे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हाताने मारहाण करून आरोपी अशोक याने लोखंडी रॉडने डोक्यात मारून शिंदे यांना जखमी केले.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.