Hinjawadi : लॉकडाउनमधील थकलेला पगार देण्याची मागणी करत फिल्ड ऑफिसरला बेदम मारहाण

Field officer beaten to death for demanding salary in lockdown

एमपीसी न्यूज – दोन महिन्यांचा थकलेला पगार आत्ताच्या आत्ता पाहिजे, अशी मागणी करत तीन जणांनी मिळून कंपनीतील फिल्ड ऑफिसरला बाहेर बोलावून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री साडेसात वाजताच्या सुमरास हिंजवडी फेज एक येथे घडली.

कृष्णा रगडे, सावन साळुंखे, सुरज साळुंखे (तिघे रा. दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निलेश अशोक तायडे (वय 36, रा. माणगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तायडे पेरे ग्रीन ग्रेडिंग कंपनी दिघी येथे फिल्ड ऑफिसर म्हणून नोकरी करतात. तर आरोपी कृष्णा रगडे हा त्याच कंपनीत वॉचमन म्हणून काम करत होता. कृष्णा याचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा पगार बाकी आहे. कामगारांचे पगार देण्याचे काम कंपनीकडून सुरु आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, शनिवारी रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी तायडे यांना पगारासंदर्भात बोलायचे आहे, म्हणून हिंजवडी फेज एक सर्कल येथे बोलावून घेतले. फिर्यादी आणि त्यांचा मित्र तिथे गेले असता आरोपीने माझा पगार मला आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. आरोपी सुरज याने फिर्यादी यांना कवळ्यात पकडले.

तर आरोपी सावन याने दगडाने डोक्यात मारून जखमी केले. तसेच आरोपींनी फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.