Hinjawadi : फेज दोनमधील व्हेरॉक कंपनीला भीषण आग

एमपीसी न्यूज – हिंजवडी फेज दोन मधील व्हेरॉक लायटिंग सिस्टिम प्रा. लि. कंपनीला भीषण आग लागली. ही घटना आज, मंगळवारी (दि. 18) पहाटे घडली. या कंपनीमध्ये वाहनांना लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे तयार केले जातात

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज दोनमध्ये व्हेरॉक ही कंपनी आहे. कंपनीला पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. काही क्षणात आगीचा भडका उडाला आणि आगीने उग्र रूप धारण केले. काही वेळेत मोठ्या प्रमाणात आग लागली.

पुणे अग्निशमन व पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे संत तुकाराम नगर, रहाटणी येथील तसेच हिंजवडी एमआयडीसी फेज १ व फेज २ अग्निशमन दलाचे बंब, पीएमआरडीएचे दोन बंब त्याचप्रमाणे पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. मात्र, आग मोठ्या प्रमाणात लागली असल्याने जवानांना आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. आगीचे नेमके कारण तसेच जखमींबद्दल माहिती मिळाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.