Hinjawadi: विवाहितेच्या छळप्रकरणी तहसीलदारासह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत तिच्याकडून 20 लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी नाशिकच्या तहसीलदारासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 2014 ते सप्टेंबर 2019 दरम्यान वसई आणि हिंजवडी येथे घडली.

तहसीलदार कैलास शंकर कडलक याच्यासह पती सूर्यकांत कडु-पाटील, नणंद रेणुका कडलक, नणंद वर्षा कानवडे, नणंद गायत्री वराळे (सर्व, रा. समर्थनगर, औरंगाबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 32 वर्षीय विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बाळंतपणासाठी माहेरी गेल्या असताना आरोपी पती सूर्यकांत याने वडिलांकडून 20 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. त्यासाठी आरोपींनी आपसात संगनमत करून महिलेला वेळोवेळी मारहाण करत तिचा शाररिक व मानसिक छळ केला.

आरोपी तहसीलदार शंकर कडलक हा महिलेचा नंदावा असून त्याने ‘मी तहसीलदार आहे, तुला संपवून टाकेन’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.