BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : तरुण-तरुणीच्या अपहरणप्रकरणी चौघांना अटक

एमपीसी न्यूज – मित्रासोबत मोटारीतून घरी जात असलेल्या तरुणीला व तिच्या मित्राला दमदाटी केली आणि त्यांचे अपहरण केले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास भूमकरवस्ती येथे घडली.

हरीश सिद्धू पाटील (वय 23, रा. बिबवेवाडी), आनंद मोहन खरात (वय 21, रा. टिंगरेनगर), योगेश प्रकाश म्हस्के (वय 21, रा. विमाननगर) आणि विजय रमेश पाटील (वय 24, रा. चंदननगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी तरुणी तिच्या मित्रासोबत मोटारीतून घरी जात होती. त्यावेळी आरोपींनी काहीही कारण नसताना त्यांची मोटार अडवली. तुम्ही लॉजमधून बाहेर आले आहेत काय?, अशी विचारणा करत जबरदस्तीने त्यांच्या मोटारीत बसून तरुणी आणि तिच्या मित्राला विमाननगर येथे नेले.

  • यातील तरुणी आणि तिच्या मित्राचा शोध लागला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3