Hinjawadi : पिंपरी-चिंचवड शहरातून एका कारसह चार वाहने पळविली; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, हिंजवडी, वाकड आणि चाकण परिसरातून चार वाहने चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी शनिवारी (दि. 11) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सांगवी परिसरातून कार तर हिंजवडी, वाकड आणि चाकण परिसरातून दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

अक्षय अनील गुंडावर (वय 26, रा. वेस्टसाइड काउंट्री, पिंपळे गुरव. मूळ रा. नांदेड) यांनी कार चोरीला गेल्याची फिर्याद सांगवी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय यांनी 10 डिसेंबर रोजी सकाळी त्यांची कार (एम एच 14 / जी यु 0542) सोसायटीच्या पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमधून कार चोरून नेली. हा प्रकार 12 डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी 11 जानेवारी रोजी फिर्याद दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

ख्वाजा मैनुद्दिन जमील बासले (वय 46, रा. कोंढवा खुर्द) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी त्यांची तीस हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच 12 / एम यु 9235) चांदणी चौकातील भोगाव रोडवर असलेल्या बंद पेट्रोल पंपाशेजारी हँडल लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 9 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी दीडच्या सुमारास घडला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

विक्की बजरंग कारकूड (वय 26, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्की यांनी त्यांची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 12 / आय एम 4694) शुक्रवारी (दि. 10) रात्री साडेआठच्या सुमारास घराजवळ पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी नेली. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

चंद्रकांत बबन नाणेकर (वय 48, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाणेकर यांनी त्यांची पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / डी एल 1734) गुरुवारी (दि. 9) रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like