Hinjawadi Fraud : प्लॉट खरेदी करूनही प्लॉट नावावर न करता ग्राहकाची तीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – प्लॉट खरेदी करण्यासाठी (Hinjawadi Fraud) ग्राहकाकडून पैसे घेतले. मात्र, बुक केलेला प्लॉट नावावरही केला नाही अन त्याचे पैसे परत न करता तीन कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना सन 2012 ते सन 2021 या कालावधीत साईरंग डेव्हलपर्स हिंजवडी आणि हिंजवडी परिसरात घडली.

तेजस सॅमसन गायकवाड (वय 36 , रा. रा. किवळे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साईरंग डेव्हलपर्सचे मालक के. आर. मलिक, शाहरुख मलिक, एक महिला आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Moshi news : मोशी येथे गोवंश सदृश मांस विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या प्लॉट धारकांनी साईरंग डेव्हपर्सचे मालक आरोपी यांना सन 2012 ते सन 2021 या कालावधीत हिंजवडी (Hinjawadi Fraud) आणि हिंजवडी परिसरात इतर ठिकाणी प्लॉट घेण्यासाठी पैसे दिले. आरोपींची पैसे घेऊन नागरिकांना त्यांनी बुक केलेला प्लॉट आगर बुक केलेल्या प्लॉटचे पैसे परत न देता तीन कोटी सहा लाख नऊ हजार 743 रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.