Hinjawadi : प्लॉट खरेदी व्यवहारात सुमारे 15 लाखांची फसवणूक; एकास अटक

एमपीसी न्यूज – प्लॉट खरेदी व्यवहारात एका नागरिकाची सुमारे 15 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना फेब्रुवारी 2015 ते ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत बाणेर येथे घडली.

सुभाष रामचंद्र खडतरे (वय 42, रा. निरंजन हौसिंग सोसा. बाणेर) यांनी सोमवारी (दि. 14) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार के. शब्बीरबाबू अब्बूबकर कीझाक्कूम (वय 42, रा. वात्सल्य विहार, औंध) यास पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सहायक निरीक्षक देंडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खडतरे आणि आरोपी कीझाक्कूम यांच्यामध्ये प्लॉट खरेदीचा व्यवहार ठरला. आरोपी कीझाक्कूम याने खडतरे यांना विश्वासात घेऊन सातबारा करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांच्याकडून सुमारे 14 लाख 69 हजार 936 रुपये घेतले.

पैसे मिळाल्यानंतर कीझाक्कूम यांनी खडतरे यांना कोणताही प्लॉट न देता त्यांची फसवणूक केली. तसेच, कीझाक्कूम याने आणखी काहीजणांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.