Hinjawadi : हॉटेलमध्ये घुसून टोळक्याचा राडा

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये घुसून टोळक्याने तोडफोड करत राडा केला. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री आठच्या सुमारास हिंजवडी फेज दोन येथे असलेल्या हॉटेल पंजाब रसोई येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज दोन येथे हॉटेल पंजाब रसोई हे हॉटेल आहे. रात्री आठच्या सुमारास दहा ते पंधरा जण हॉटेलमध्ये घुसले. त्यांच्याकडे असलेल्या कोयत्यासारख्या शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी कामगारांना बाहेर काढले. तसेच सामानाची तोडफोड केली. दरम्यान काही कामगारांना मारहाण करण्यात आली असून कामगार जखमी झाले आहेत.

भर चौकात ही घटना घडल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.