Hinjawadi : हिंजवडी पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलिसांनी हुक्का पार्लरवर छापा मारला. ही कारवाई सोमवारी (दि. 10) रात्री सव्वा आठच्या सुमारास भूगाव रोड बावधन येथे ग्रीन हाऊस हॉटेल येथे करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

संजय संभुलाल तुरी (वय 38, रा. बावधन, पुणे. मूळ रा. झारखंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विशाल बो-हाडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूगाव रोड बावधन येथे ग्रीन हाऊस या हॉटेलवर बेकायदेशीररित्या हुक्का स्पॉट आणि हुक्का फ्लेवर विक्री केला जात असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला. मोठ्या प्रमाणात हुक्का स्पॉट आणि हुक्का फ्लेवर जप्त करत संजय तुरी याच्यावर सिगारेट व जम्बाखुजन्य उत्पादने अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.