Hinjawadi : हिंजवडी पोलिसांचा ‘स्पा सेंटर’वर छापा; 10 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलिसांनी ‘स्पा सेंटर’वर छापा मारून दहा महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 7) रात्री साडेसात वाजता वाकड-हिंजवडी रोडवरील व्हाईट स्क्वेअर मॉलमधील ‘कनक स्पा सेंटर’ येथे करण्यात आली.

विशाल पवनकुमार अगरवाल (वय 40, रा. मोहननगर, चिंचवड), वंदना ज्ञानोबा अडागळे (वय 36, रा. कर्वे नगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड-हिंजवडी रोडवर असलेल्या व्हाईट स्क्वेअर मॉलमध्ये कनक स्पा सेंटर आहे. त्या सेंटरमध्ये दोन आरोपी काही महिलांना मसाज आणि वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी ‘कनक स्पा सेंटर’वर छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी 10 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. तसेच स्पा सेंटर चालवणा-या दोघांना अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.