Hinjawadi : बेकायदेशीरपणे घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरात बेकायदेशीरपणे आल्याने विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरुण व त्याच्या आईस चौघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नेरे दत्तवाडी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

श्रीजय सुरेश जाधव (वय 31, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, स्वप्नील प्रकाश जाधव, पुजा स्वप्नील जाधव, सिंधु प्रकाश जाधव, प्रकाश नथू जाधव (सर्व रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्या वडिलांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. याबाबत फिर्यादी श्रीजय आणि त्यांची आई विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.