BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : ट्रक चालकाला लुटणा-या दोन सराईत चोरट्यांना अटक; 1 हजार 200 रुपयांची रोकड जप्त

हिंजवडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर पुनावळे येथे तीन ट्रकचालकांना लूटून पळालेल्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1 हजार 200 रुपयांची रोकड आणि इतर माल हस्तगत करण्यात आला आहे.

जावेद ईद्रीस शेख (वय 19, रा. वाकड), सागर सुरेश जगताप (वय 25, रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार महादेव किसन सुकळे (वय २६, रा. चिखली) हा फरार आहे. याप्रकरणी वसीम अक्रम रमजान (वय 22, रा. नुहु, हरियाणा) यांनी फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर पुनावळे येथील गोकुळ हॉटेलसमोर सोमवारी (दि. 12) पहाटे सव्वादोनच्या सुमारास वसीम आणि त्यांचे दोन ट्रकचालक मित्र गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी जावेद, सागर आणि महादेव आले. त्यांनी जबरदस्तीने तीन ट्रक चालक मित्रांकडून जबरदस्तीने 3 हजार 40 रुपये चोरून नेले.

त्यानंतर, शनी मंदिर वाकड येथे हिंजवडी पोलिसांना काळ्या रंगाची नंबरप्लेट नसलेली मोटारसायकल घेऊन दोघेजण वेगात जाताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता पोलिसांना पाहून दोघेजण पळून जाऊ लागले. पोलिसांनी शिताफीने अडवून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या आणखी एक साथीदार महादेव याच्यासोबत मिळून ट्रकचालकांना लुटल्याचा गुन्हा केल्याचे कबूल केले. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील चोरी आणि घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. सागर जगताप याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात तीन, चिंचवड पोलीस ठाण्यात दोन आणि सांगवी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

HB_POST_END_FTR-A2

.