Hinjawadi News : विप्रो सर्कल जवळ कारवर होर्डिंग पडले

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथील विप्रो सर्कल जवळ होर्डिंग पडले. त्यामध्ये कार आणि दुचाकी अडकली. ही घटना आज (सोमवारी, दि. 22) दुपारी घडली.

हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यभर ठिकठिकाणी मुसळधार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. सोमवारी दुपारी हिंजवडी परिसरात जोरदार वारा सुटला. त्यात विप्रो सर्कल जवळ उंच लोखंडी होर्डिंग रस्त्यावर पडले.

रस्त्याने जाणारी कार आणि एक दुचाकी होर्डिंगखाली सापडली. मात्र सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. होर्डिंगच्या खाली सापडलेल्या कारचे नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.