Hinjawadi : कोरोना साथीबाबत निष्काळजी करणा-या हॉटेल चालकावर गुन्हा

0

एमपीसी न्यूज – कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणा-या एका हॉटेल चालकावर हिंजवडी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 15) रात्री पावणे अकरा वाजता मेझा 9 चौकातील रेड्डीज बिर्याणी येथे करण्यात आली आहे.

मोहन चटकुपल्ली रेड्डी (वय 47, रा. भूमकर चौक, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अमर अदनाथ राणे (वय 39) यांनी शुक्रवारी (दि. 16) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रेड्डी याचे मेझा 9 चौकात रेड्डीज बिर्याणी हे हॉटेल आहे. कोरोनाची साथ सुरु असताना आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी हॉटेलसमोर लोकांची गर्दी जमवली. तसेच तोंडाला मास्क न लावता निष्काळजीपणा केला. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.