Hinjawadi : हॉटेलच्या कुककडून हॉटेल मालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – जाब विचारला म्हणून थेट हॉटेल मालकाचा गळा आवळून पगाराची मागणी (Hinjawadi) करणाऱ्या कुकला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.25) हिंजवडी फेज-2 येथील सॉलीटरी हॉटेलमध्ये सकाळी नऊ वाजता घडली आहे.

याप्रकरणी क्रिशांत राजीव अगरवाल (वय 30 रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी कुक गौरहरी गिरीधारी मंडल (वय 30 रा.मुळ कोलकत्ता) याला अटक केली आहे.

Mobile Theft : चालणाऱ्या तरुणीचा धक्का मारून मोबाईल पळवला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई यांनी आरोपीला हॉटेलच्या फ्रीजमध्ये सडलेला कोबी पाहून तो वेळीच का फेकला नाही, अशी विचारणा केली असता त्याचा राग मनात धरून आरोपीने हॉटेल मालक क्रिशांत यांचे कॉलर पकडून माझा आत्ताच्या आत्ता पगार द्या अशी मागणी केली. पगार नाही दिली तर मी तुमचा खून करीन अशी धमकी देत फिर्यादीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. यावेळी हॉटेल मॅनेजरने मध्यस्थी करून भांडण सोडवले. यावेळी फिर्यादीचे वडील यांनीही आरोपीला समजवण्याचा प्रयत्न केला असता (Hinjawadi) आरोपीने त्यांच्या अंगावरही काठी घेऊन धावून गेला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.