Hinjawadi : संचारबंदी दरम्यान हिंजवडीत घरफोडी

0

एमपीसी न्यूज – संपूर्ण राज्यात संचारबंदी सुरू असल्यामुळे कुणाला कुठेही विनाकारण फिरण्याची मुभा नाही. अशा परिस्थितीतही अज्ञात चोरट्यांनी घरफोडी  केल्याचा प्रकार हिंजवडी येथे घडला आहे. हा प्रकार मंगळवार (दि. 24) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला.
विजया नरसिंगराव नन्ना (वय 50, रा. महाळुंगे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर 21 मार्च ते 24 मार्च या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप कशाचातरी सहाय्याने तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये असलेले कपाट उचकटून 27 हजार 850 रुपयांची रोख रक्कम आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याची फुले, दोन  ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन असा एकूण 48 हजार 850 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A2
You might also like