Hinjawadi : 15 मिनिटात कामे केली नाही म्हणून पतीने आवळला पत्नीचा गळा

एमपीसी न्यूज – मी दिलेली कामे 15 मिनिटात कर म्हणत (Hinjawadi) पतीने मारहाण करत पत्नीचा गळा दाबला. हा धक्कादायक प्रकार  बावधन येथे मंगळवारी(दि.6) घडला.

याप्रकणी पीडित पत्नीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून  पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला घरातील काही कामे व वीजबिल भरण्यास सांगितले. यावेळी त्याने 15 मिनटात कामे पूर्ण करायची धमकी दिली.

यावेळी पिडीतेने आजारी असल्याने उद्या कामे करते किंवा आज (Hinjawadi ) तुम्ही कामे करा अशी विनंती केली. आरोपीला याचा राग आला व त्याने फिर्यादीला मारहाण करत तिचा गळा दाबला.

यावरून हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा रबर उद्योगाशी संबंधित दोन संस्थांशी करार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.