Hinjawadi : दुकानासमोरील दुचाकी काढण्यास नकार दिल्याने महिलेसह पतीलाही मारहाण

एमपीसी न्यूज – दुकानापुढे लावलेली दुचाकी काढण्यास नकार दिल्याने महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत विचारणा करण्यास गलेल्या पतीलाही जखमी केले. ही घटना हिंजवडी आयटी पार्क फेज 3 येथे 31 डिसेंबर 2019 ते शुक्रवार (दि. 3) दरम्यान घडली.

कैलास तुकाराम शिर्के (वय 51, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नितीन दत्तात्रय दळवी (रा. नेरे, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिंसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दळवी आणि त्याचे शेजारी यांच्यात जागेवरून वादावादी चालू होती. फिर्यादी शिर्के यांची दुचाकी त्यांच्या दुकानासमोर लावली होती. ती दुचाकी काढ, असे आरोपी म्हणाला. गाडी काढणार नाही, असे फिर्यादी शिर्के यांच्या पत्नीने सांगितले. त्यावेळी आरोपीने त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

फिर्यादी त्याला याबाबत विचारण्यास गेले असता त्यांच्या दुकानातील काट्याचे वजनमाप डोक्यात मारून आरोपीने त्यांना जखमी केले. तसेच झटापटीत फिर्यादी यांच्या पत्नीचे कर्णफूल पडून गहाळ झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.