Hinjawadi : कॅन्टीन चालविण्यास देण्याच्या वादातून पती- पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज – ‘कॅन्टीन’ चालवण्यास देण्याच्या वादातून पती-पत्नीला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 23) सकाळी अकराच्या सुमारास मारुंजी येथे घडली.

सागर सुनील कवडे (वय 28, रा. कवडेवस्ती, मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मण भागुजी कवडे (रा. मारुंजी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर यांचे कॅन्टीन आहे. ते कॅन्टीन ते दुस-याला चालविण्यासाठी देणार होते. शनिवारी सकाळी आरोपी लक्ष्मण याने ‘कॅन्टीन कसे चालवण्यास देतो तेच मी बघून घेतो’ असे म्हणत फिर्यादी सागर व त्यांची पत्नी शुभांगी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचा जाब सागर यांनी विचारला असता लक्ष्मण याने लाकडी दांडक्याने दोघांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.