Hinjawadi: वेश्या व्यवसायातून चार उच्चशिक्षित तरुणींची सुटका; पाच जणांना अटक

हिंजवडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज –  मारुंजी परिसरात दिल्लीतील उच्चशिक्षित तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या पाच जणांना हिंजवडी पोलिसांनी  अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  चार तरुणींची सुटका करण्यात आली. मुळशी तालुक्यातील मारुंजी येथील लाईफ रिपब्लिक सोसायटीत हा प्रकार सुरु होता. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. 

याप्रकरणी आर्यन उर्फ विश्वास बळीराम सावरगावकर (वय 34, रा. कोथरुड), नितीन शरद भालेराव (वय 25), अभय सज्जनराव शिंदे (वय 25 ), मयुर गणेश शर्मा (वय 28, ) आणि दिलीप भागीरथ मंडल (वय 24, सर्व रा.  मारुंजी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या तरुणी परराज्यातील आहेत. बिहार, छत्तीसगड आणि ठाण्यातील नालासोपारा येथील या तरुणी आहेत. त्या  दिल्लीत शिक्षण घेत होत्या. मॉडेलिंग करीत होत्या. त्यांच्यातील एक तरुणी इव्हेट मॅनेजमेंटचा कोर्स करीत आहे. आरोपींनी त्यांना जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यात आणले होते. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. हिंजवडी पोलिसांनी गुरुवारी रात्री मारुंजी येथील लाईफ रिपब्लिक सोसायटीतील एका सदनिकेवर छापा टाकून चार उच्चशिक्षित तरुणींची सुटका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.