Hinjawadi : प्रतिकार केला म्हणून महिलेचा विनयभंग; एकवर गुन्हा दाखल

0 201

एमपीसी न्यूज – छेडछाड करणा-याला प्रतिकार केला असता आरोपीने महिलेवर बळजबरी करत तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 9) हिंजवडी येथे घडली आहे.

HB_POST_INPOST_R_A

याप्रकरणी 33 वर्षीय पिडीतेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रशांत वसंत भाटीया (वय 41) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिडीतेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे पीडित महिलेने त्याला प्रतिकार केला. त्यामुळे चिढलेल्या आरोपीने महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: