Hinjawadi : सहाव्या मजल्यावरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज – हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 13) सकाळी हिंजवडी फेज तीन येथे मेगापोलीस सोसायटी येथे घडली.

विद्यासागर पाथा (वय 25, रा. मेगा पोलीस ओसायटी, हिंजवडी, मूळ रा. विशाखापट्टणम) असे आत्महत्या केलेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मेगा पोलीस सोसायटीमध्ये राहणाऱ्या तरुणाने सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ उपचारासाठी विद्यासागर याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. विद्यासागर हिंजवडी फेज तीन मधील टेक महिंद्रा कंपनीत काम करीत होता. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.