Hinjawadi : आयटी अभियंत्यास भरदिवसा लुटले

एमपीसी न्यूज – रस्त्यामध्ये गाठून भरदिवसा आयटी अभियंत्यास तीन जणांनी मिळून लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 3) दुपारी दोनच्या सुमारास दत्तवाडी, नेरे येथे घडली.

सुरज सुदर्शन प्रसाद (वय 32, रा. दत्तवाडी, नेरे. मूळ रा. फुलवारी शरीफ वालमी, जि. पटना बिहार) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज हे हिंजवडी फेज तीन येथील कॉग्निझंट कंपनीत नोकरी करतात. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. दरम्यान आरोपींनी त्यांना रस्त्यामध्ये अडवून जबरदस्तीने बाजूला नेले. आरोपींनी सुरज यांना मारहाण करत त्यांचे पाकीट काढून घेतले. तसेच त्यांची मोटरसायकल चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.