Hinjawadi : बनावट सरकारी शिक्क्यांच्या आधारे 73 गुंठे हडपले

एमपीसी न्यूज – सरकारी बनावट शिक्के तयार करून त्याआधारे बनावट कागदपत्रे तयार करून 73 गुंठे जमिनीचे खरेदीखत तयार करून घेतले. हा प्रकार वाकड येथे घडला.

विठ्ठल एकनाथ भुजबळ (वय 55, रा. भुजबळ वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मल्हारी किसन भुजबळ, ज्ञानोबा किसन भुजबळ, चंद्रकांत किसन भुजबळ (सर्व रा. भुजबळ वस्ती, वाकड) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे फिर्यादी विठ्ठल भुजबळ यांची 73 आर जमीन आहे. या जमिनीचे मूळ कागदपत्र फिर्यादी यांच्याकडे आहेत. मात्र आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांनी ही जमीन आरोपींना विकल्याची बनावट कागदपत्रे बनवली. सरकारी नकली शिक्के तयार केले. ते शिक्के बनावट कागदपत्रांवर मारले आणि ही जमीन फिर्यादी यांनी आरोपींना विकली असल्याचा खोटा दस्तऐवज महसूल कार्यालय पुणे येथे सादर केला. त्याआधारे आरोपींनी स्वतःची या जमिनीच्या 7/12 उता-यावर लावली.

ही बाब फिर्यादी विठ्ठल यांना समजली असता त्यांनी तात्काळ न्यायालयात धाव घेतली आणि हे प्रकरण न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाच्या ही फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर आरोपींविरोधात सीआरपीसी 156 (3) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अदयाप अटक करण्यात आली नाही. पोलीस उपनिरीक्षक नंदराज गभाले तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.