Hinjawadi : मित्रांमध्ये शाब्दिक चकमक; दोघांकडून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – तीन मित्र रस्त्याने बोलत जात असताना त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावरून दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या मित्राला लोखंडी रिंग पान्याने मारहाण केली. यामध्ये तिसऱ्या मित्राला गंभीर दुखापत झाली. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री सातच्या सुमारास चांदणी चौक बावधन येथे घडली.

संजय कृष्णा कोंडेकर (वय 29, रा. माताळवाडी फाटा भुगाव) असे जखमी मित्राचे नाव आहे. त्याने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बुक्या माझिरे (वय 30, रा. भुकूम, ता. मुळशी) आणि दादा खाटपे (वय 35, रा. शास्त्रीनगर कोथरूड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय, बुक्या आणि दादा हे तिघेजण मित्र आहेत. ते सोमवारी रात्री कोथरूड येथील चांदणी चौकातून रस्त्याने पायी बोलत जात होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. यामध्ये बुक्क्या आणि दादा या दोघांनी मिळून संजय यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

तसेच लोखंडी रिंग पान्याने संजय यांच्या डोक्यात मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.