Hinjawadi : माणमध्ये पुन्हा लॉकडाउन ; 9 ते 16 जुलै दरम्यान कडकडीत बंद

Lockdown again in Man ; Strictly closed from 9 to 16 July :लॉकडाउनमध्ये विनाकारण फिरताना आढळल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे

एमपीसी न्यूज – माणमधील वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता माण ग्रामपंचायतीने 9 ते 16 जुलै दरम्यान संपूर्ण लॉकडाउन घोषित केला आहे. दरम्यान, लॉकडाउनमध्ये विनाकारण फिरताना आढळल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.

लॉकडाउन कालावधीत मेडिकल स्टोअर वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून सकाळी 7 ते 8 या वेळेत एक तास दूध विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.

हिंजवडी व आसपासच्या गावांमध्ये बरीच ठिकाणे व इमारती सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. गेल्या तीन दिवसापासून राजीव गांधी आयटी पार्क व आसपासच्या भागात हिंजावडीतील आठ, नेरेमधील सहा, जांबेमधील तीन, माणमधील पाच आणि मारुंजीतील पाच, असे एकूण 27 कोरोना रूग्ण सापडले आहेत.

रूग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मावळ – मुळशी उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी खालील ठिकाणे सूक्ष्म कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात रहिवाशांच्या हालचालींवर बंधन असणार आहेत.

सूक्ष्म कंटेन्मेंट झोन

हिंजवडी – मुकईनगर; ब्लू रिज टाउनशिपमधील टॉवर 12, 20, बी 2; गुना पीजी लक्ष्मी चौक

माण – मेगापोलिस स्पार्कलेट

कासारसाई – विठ्ठल मंदिर परिसर

माले – शेंडे पाटील वस्ती

बावधन – बी 22, हाय क्लास रेसिडेन्सी, पाटीलनगर

पिरंगुट – ओंकार सोसायटीची ए, बी विंग ; प्लॅाट नं 201 टाउनहाऊस के बिवा; निवासनगर सोसायटी

बावधन बुद्रुक – करण सनकोस्ट

बावधन – जाधव वस्ती

हडशी – बोध वसाहत

भुमकुम – वैरवनाथ मंदिर परिसर

भुगाव – करंजवणे राम नदी परिसर; सिद्धिविनायक समाज सनसनगर

मालेगाव – मालेगाव गावठाण परिसर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.