Hinjawadi : प्रियकराचा लग्नाला नकार; प्रेयसीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथे (Hinjawadi) राहणाऱ्या तरुणीने आत्महत्या केली. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली असून याप्रकरणी 21 नोव्हेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव पाटील (रा. धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी पुण्यात मोर्चा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव पाटील आणि फिर्यादी हे वेगवेगळ्या जातीचे आहेत. तरीही गौरव याने फिर्यादी यांच्या (Hinjawadi) मुलीसोबत मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवले. त्याने फिर्यादी यांच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास त्याने नकार दिला. या नैराश्यातून तरुणीने राहत्या खोलीत आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.