Hinjawadi : महावितरणतर्फे इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन

एमपीसी न्यूज- इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून महावितरण कंपनीने आता हिंजवडी येथे चार्जिंग स्टेशन सुरु केले आहे. हिंजवडी फेज 2 मधील वीज उपकेंद्रात चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून फेब्रुवारी अखेर ते कार्यान्वित होणार आहे.

प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने, इंधन खर्चामध्ये बचत होण्यासाठी केंद्र सरकारने इलेक्ट्रिक मोटारी व दुचाकींच्या वापरला प्राधान्य दिले आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या जास्त किमती, चार्जिंग स्टेशनची कमतरता यामुळे या वाहनांच्या मागणीमध्ये वाढ होताना दिसत नाही.

त्यासाठी आता महावितरण कंपनीने पुढाकार घेतला असून पुण्यात चार-पाच ठिकाणी चार्जिंग स्टेधान उभारण्यात आलेली आहेत. पिंपरी- चिंचवडमध्ये खासगी वाहनांसाठी एकही चार्जिंग स्टेशन नव्हते. त्यामुळे महावितरण कंपनीने हिंजवडी फेज 2 मधील एमक्युअर फार्मास्युटिकल कंपनीजवळील वीज उपकेंद्रात नवीन चार्जिंग स्टेशनची उभारणी केली आहे. या स्टेशनला सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च आला आहे. वाहनधारकांकडून प्रति युनिट 5 ते 6 रुपये आकारण्यात येणार आहेत अशी माहिती महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. फेब्रुवारी अखेर हे स्टेशन कार्यान्वित होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.