_MPC_DIR_MPU_III

Hinjawadi : मेडिकल दुकान फोडून 65 हजारांचे साहित्य लंपास

Materials worth Rs 65,000 were stolen from the medical shop

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकटून आत प्रवेश केला. मेडिकलमधून सॅनिटायझर, परफ्युम, कोलगेट, औषधे आणि अन्य साहित्य असा एकूण 65 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 22) सकाळी साडेसहा वाजता जांभे येथे उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_IV

अश्विनी संजय वाघमारे (वय 24, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अश्विनी वाघमारे यांचे मुळशी तालुक्यातील जांबे गावात धर्मवीर संभाजी महाराज चौकात ‘अश्विनी मेडिकल स्टोअर्स’ हे दुकान आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजता अश्विनी यांनी त्यांचे मेडिकल दुकान कुलूप लाऊन बंद केले.

रात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून शटर उचकटून मेडिकल दुकानात प्रवेश केला. दुकानातून परफ्युमच्या बाटल्या, वेगवेगळ्या कंपनीचे फेसवॉश, स्क्रब, पिल्स, शाम्पू, कंडीशनर, सॅनिटायझर, लिक्विड सॅव्हलॉन, लोशन, फेसियल कीट, ब्लीच पाऊडरचे डबे, हॅन्डवॉश, साबण, क्रीम, कोलगेट, बिस्कीट, आयुर्वेदिक मे़डिसिन, कफ सिरफ, बोर्नविटा, हॉरलिक्स, बुस्ट कॉम्पेन, दुध, चॉकलेट इत्यादी 65 हजारांचे साहित्य चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.