Hinjawadi : रस्त्यावर थांबलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला थांबून मोबाईलवरून कॅब बुक करत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री साडेनऊच्या सुमारास लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे घडली.

वैभव व्यंकट बोरुळकर (वय 28, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव रविवारी साडेनऊच्या सुमारास हिंजवडी मधील लक्ष्मी चौकात उभे राहून मोबाईलवरून कॅब बुक करीत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांचा 13 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.