Hinjawadi : अल्पवयीन मुलीसमोर ड्रामा करणाऱ्या रोडरोमिओवर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – आपल्या प्रेमाचा स्वीकार करावा, यासाठी अल्पवयीन मुलीसमोर ड्रामा करणाऱ्या रोडरोमिओवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मारुंजी येथे घडली.

दादा गडसिंग (वय 25, रा. वाकडकर वस्ती, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी कॉलेजमधून येत असताना आरोपीने मारुंजी येथे तिला रस्त्यात अडविले. तिचा हात पकडून स्वतःकडे असलेली काचेची बाटली स्वंतःच्या डोक्‍यात मारून घेतली. “माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपण लग्न करून सोबत राहू. तू हो म्हण, नाहीतर मी जीवाचे बरे वाईट करून घेईल, अशी धमकी देत तिचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.