Hinjawadi : कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – महिलेला सोशल मीडियावर अश्लील मेसेज करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. याबाबत महिलेने पोलिसात तक्रार दिल्यास तिच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी दिली. ही घटना 26 नोव्हेंबर 2017 ते 20 जून 2019 या कालावधीत कासारवाडी येथे घडली.

याप्रकरणी 60 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष भाऊसाहेब बो-हाडे (रा. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष बो-हाडे याने 26 नोव्हेंबर 2017 ते 20 जून 2019 या कालावधीत 9561623084 आणि 9075683369 या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादी महिलेला व्हाट्स अपवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून लैंगिक सुखाची मागणी केली. मेसेज पाठवण्यास महिलेने मज्जाव केला असता बो-हाडे याने ‘मी मेसेज पाठवत राहीन, तू माझ्या नावाची पोलीस चौकीत कम्प्लेंट कर. मी तुझ्या ऑफिसमध्ये जाऊन कोणी असेल त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देणार आहे’ अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.