Hinjawadi : नेमबाजी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा बालेवाडी क्रीडा संकुलातील व्यवस्थापकाकडून विनयभंग

एमपीसी न्यूज – नेमबाजीच्या बेसिक कोर्ससाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीचा बालेवाडी क्रीडा संकुलातील व्यवस्थापकाने विनयभंग केला. ही घटना गन फॉर ग्लोरी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे 14 ते 20 मे या कालावधीत घडली.

रुद्र चनवीर गौडा पाटील (वय 24, रा. साई चौक, पाषाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या 68 वर्षीय आजीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बारा वर्षीय नातीने बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या गन फॉर ग्लोरी येथे नेमबाजीचा बेसिक कोर्स लावला होता. त्याच्या सरावासाठी ती नियमितपणे जात होती. सराव करण्यासाठी व्यवस्थापकाकडून गन घ्यावी लागते. ही गन घेताना व सराव झाल्यानंतर गन जमा करताना व्यवस्थापक पीडित मुलीशी अश्लील चाळे करीत असे. याबाबत मुलीने घरच्यांना सांगितले. त्यानुसार तिच्या आजीने हिंजवडी पोलिसात गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलिसांनी पाटील याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.