Hinjawadi : सोशल मीडियावर अश्लील मेसेज करून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या नऊ मोबाईल क्रमांकावरून महिलेला अश्लील मेसेज करून तिचा विनयभंग केला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 ते 16 जून दरम्यान ब्ल्युरीच सोसायटी, हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वेगवेगळ्या नऊ मोबाईल क्रमांकधारक ईशान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मोबाईल क्रमांकावर आरोपीने वेगवेगळ्या नऊ मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत तिच्या व्हाट्स अपवर अश्लील मेसेज केले. तसेच तिच्यावर लक्ष ठेवले. ईशान नावाच्या व्यक्तीने फिर्यादी महिलेला फोन करून त्रास दिला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.