Hinjawadi : जबरदस्तीने गाडीत बसवून अज्ञातांनी केला तरूणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – एकट्या थांबलेल्या तरूणीला जबरदस्तीने गाडीत बसवून तिच्यासोबत अश्लील चाळे करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी (दि.25) रात्री 10 च्या दरम्यान हिंजवडी वाकडरस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळील स्पाईन रोडवर घडली. या प्रकरणी संबंधित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरूणी ही आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून रावेत येथे जात असताना रस्त्यात हिंजवडी वाकड रस्त्यावर इंडियन ऑईल पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. त्यावेळी पेट्रोल पंपाच्या बाहेर स्पाईन रोडवर संबंधित तरुणी फोनवर बोलत थांबली असताना अचानक पाठीमागून एक इनोव्हा गाडी आली व त्यातून दोन अनोळखी इसम उतरले व त्यांनी तरूणीला जबरदस्तीने गाडीत ओढून बसवले. त्यानंतर तिघांनी मिळून चालू गाडीमध्ये तरूणीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. अर्ध्या तासानंतर तरूणीने गाडीतून उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली.

याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.