Hinjawadi News : घरातून एक मोबाईल, दोन लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – लक्ष्मी चौक, हिंजवडी येथील एका सोसायटीमधून अज्ञात चोरट्याने घरातून एक मोबाईल फोन आणि दोन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली.

आलोक अतुल रायपुरे (वय 22, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने 25 हजारांचा एक मोबाईल फोन, प्रत्येकी 20 हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप असा एकूण 65 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार शनिवारी (दि. 4) रात्री अकरा ते रविवारी (दि. 5) साडेआठ वाजताच्या कालावधीत घडला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.