Hinjawadi News: सोसायटीच्या ड्रेनेजच्या पाण्यात बुडून 17 वर्षीय कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या ड्रेनेजच्या पाण्यात बुडून 17 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 29) रोजी दुपारी म्हाळुंगे येथे उघडकीस आली. पवन प्रवीण जमदाडे (वय 17, रा. पुराणिक सोसायटी, म्हाळुंगे, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. राधिका प्रवीण जमदाडे (वय 38) यांनी रविवारी (दि. 30) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळू जाधवर (रा. पुराणिक सोसायटी, मुळशी) आणि ड्रेनेजचे पाणी फिल्टर पंपाचा ठेकेदार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मयत पवन हे पुराणिक सोसायटी येथील ड्रेनेजचे पाणी फिल्टर पंप येथे कामासाठी गेले. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता. कामावरही त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी हिंजवडी पोलीस ठाण्यात पवन हे बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. त्यानंतर दुपारी दीड वाजताच्या सुमारास पवन यांचा मृतदेह ड्रेनेजच्या पाण्यात मिळून आला. ठेकेदाराने ड्रेनेजचे पाणी फिल्टर पंप येथे कोणतीही सुरक्षेची साधने अथवा भिंत उभारली नाही. त्यामुळे पवन याचा पाय घसरून तो पाण्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.