Hinjawadi Crime News : मोठमोठ्याने खाकारा काढल्याचा जाब विचारल्याने 55 वर्षीय नागरिकाला मारहाण

0

एमपीसी न्यूज – घरासमोरून जाताना मोठमोठ्याने खाकारा काढत व ‘थू’.. ‘थू’.. करणाऱ्यांना जाब विचारल्याचा राग मनात धरून 55 वर्षीय नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि.18) रात्री साडेनऊच्या सुमारास ओझरकरवाडी, माण येथे घडली. मारहाणीत जखमी झालेल्या नागरिकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी बाबासाहेब दत्तू ओझरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रल्हाद बाबासाहेब ओझरकर ( रा. ओझरकरवाडी, माण) यांना अटक करण्यात आली आहे. रामकृष्ण नथू ओझरकर ( वय. 55, रा. ओझरकरवाडी, माण) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या कुटुंबासोबत घरासमोर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी रस्त्याने जाताना मोठमोठ्याने खाकारा काढत व ‘थू’.. ‘थू’.. करत जात होते.

फिर्यादींनी त्यांना याबाबत विचारणा केली. मात्र, जाब विचारल्याचा राग मनात धरून दोन्ही आरोपींनी फिर्यादी यांना गंभीर मारहाण केली. फिर्यादी या मारहाणीत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.