Hinjawadi Crime News : लॉकडाऊनचे नियम तोडून क्रिकेट खेळणाऱ्या 13 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून क्रिकेट खेळणाऱ्या 13 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांनी रविवारी (दि.23) सकाळी नऊच्या सुमारास ही कारवाई केली. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक मुलावर पाचशे रुपये दंड करण्यात आला आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवले क्रिकेट अकॅडमीमध्ये काही मुले क्रिकेट खेळत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती.

पोलीस त्या ठिकाणी पोहचल्यानंतर 13 अल्पवयीन मुले क्रिकेट खेळत असल्याचं आढळून आलं. पोलिसांना बघून मुलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्वांना समज देऊन थांबवलं. प्रत्येकावर पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ॲकडमी चालकावर देखील पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. पुन्हा अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करू नये, अशी समज देखील मुलांना देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.