Hinjawadi News: विनापरवाना कीटकनाशक तयार केल्याप्रकरणी गुन्हा; एकाला अटक

मारुंजी येथे पीसीआय पेस्ट कंट्रोल प्रा. लि. या कंपनीत आरोपींनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता 27 लाख 94 हजार 185 रुपये किमतीचे कीटकनाशकाचे उत्पादन केले.

एमपीसी न्यूज – शासनाची परवानगी न घेता एका कंपनीने कीटकनाशकाची निर्मिती, साठा आणि विक्री केली. याबाबत कंपनीच्या संचालक मंडळावर तसेच कंपनीत काम करणा-या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

अमर सुरेश राउत (वय 31, रा. गायकवाड नगर, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह मे. पीसीआय पेस्ट कंट्रोल प्रा. लि. या कंपनीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कृषी विभागाचे खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रविशंकर सिद्धेश्वर कावळे (वय 32) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी येथे पीसीआय पेस्ट कंट्रोल प्रा. लि. या कंपनीत आरोपींनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता 27 लाख 94 हजार 185 रुपये किमतीचे कीटकनाशकाचे उत्पादन केले. त्याची साठवणूक करून विक्री देखील केली.

हा प्रकार कृषी विभागाच्या निदर्शनास येताच शासनातर्फे आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.