Hinjawadi News : दाना इंडिया कंपनीच्या कामगारांना 42 हजार 500 रुपयांचा बोनस जाहीर; कामगारांची दिवाळी होणार गोड

एमपीसी न्यूज – हिंजवडी एमआयडीसी परिसरातील दाना इंडिया प्रा. ली. या कंपनीने कामगारांना 42 हजार 500 रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. शिवगर्जना कामगार संघटनेच्या वतीने मागील तीन आठवड्यांपासून बोनसबाबत कंपनी प्रशासनासोबत चर्चा सुरू होती. त्यात कामगार संघटनेला यश आले असून या निर्णयामुळे कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.

शिवगर्जना कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली दाना इंडिया प्रा. ली. या कंपनीतील कामगारांना बोनस मिळण्यासाठी मागील तीन आठवड्यांपासून कंपनी प्रशासनासोबत चर्चा सुरू होती. कोरोना काळातील आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत कंपनीने सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र नंतर कामगार हिताचा निर्णय घेत बोनसच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

कंपनीतील कामगारांना दिवाळीनिमित्त 42 हजार 500 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. बोनसच्या करारावर सही करतेवेळी कंपनीचे प्लांटहेड अजय प्रभु, एच आर मॅनेजर राज गावडे, महेश कोरटकर, प्रोडक्शन हेड अजय नेरे, संघटनेचे अध्यक्ष संतोष बेंद्रे, हौशीराम कर्डिले, अक्षय रसाळ, अमितकुमार लांडगे, सुदर्शन नांदखिले, बालाजी खंकाळ, दत्ता शिंदे, अक्षय सोनवणे आदी उपस्थित होते.

भरघोस बोनस मिळल्याने कंपनीतील कामगारांची दिवाळी गोड होणार असल्याच्या भावना कामगारांनी व्यक्त केल्या. सर्व कामगारांनी कंपनीनीच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी तसेच गुलालाची उधळण करून पेढे वाटून आनंद साजरा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.